विखुरणाऱ्या एका जोडप्यास घटस्फोट होण्यापासून वाचवण्यात लेवा पंचायत भुसावळ शाखेला यश ; स्तुत्य उपक्रम ;


यावल – तालुक्यातील एका खेड्यातील सतीश राणे (नाव बदललेले ) नावाचा तरुण, जो पुण्याला चांगल्या कंपनीत नोकरी करत होता व सावद्याजवळील एका छोट्या गावातील तरुणी (नाव बदललेले ) नीशा पाटील , यांचं 14 महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपे पुण्याला राहायला गेले. राजाराणीचा संसार सुरळीत सुरू झाला , आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. सर्व काही आनंदात चालू होते. मात्र या प्रवासात दोघांचे या ना त्या कारणावरून हळूहळू खटके उडायला लागले . याचे कारण एकच सतीशला असलेले दारूचे व्यसन.
दिवसभर अगदी व्यवस्थित असलेला हा मुलगा संध्याकाळ झाली की दारू शिवाय राहत नव्हता .
नीशाने सुरुवातीला दुर्लक्ष केलं नंतर प्रेमाने समजावून, रागावून बघितलं, चिडून बघितलं, भांडून बघितलं, पण सतीश वर तात्परता परीणाम व्हायचा. पण शेवटी नीशाचा संयम संपला व ती गावाकडे माहेरी निघून आली. पूर्ण विचारांती भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेत घटस्फोटासाठी अर्ज भरण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे अर्ज भरला.
याप्रकरणी अध्यक्ष सुहास चौधरींनी सर्व प्रकरण समजावून घेतले व त्यांच्या लक्षात आले की खूप काही मोठी समस्या नाही आहे. प्रयत्न केला तर यावर मार्ग निघू शकेल. त्यांनी इतर पंचाशी चर्चा केली. दरम्यान पंचायतीच्या नियमानुसार सतीशला नोटिस गेली. तो तारखेवर हजर झाला. सतीश व नीशा समोरासमोर आले.
सहा महिन्यांच्या कालावधीत दोघांना एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले होते.
भोरगांव पंचायतीच्या पंचानी व सुहास चौधरी यांनी सतीशला समजावले.प्रयत्न कले तर व्यसन सोडता येते हे ही समजावून सांगितले. सतीशने पुण्याला जाऊन व्यसनमुक्तीच्या केंद्रात जाऊन उपचार घेतले, नीशाने संयमाने समजुतीने घेऊन सहकार्य केले. सहा महिन्यांतच सतीश मधे लक्षणिय फरक दिसायला लागला. निशाला समुपदेशिका सौ आरती चौधरी यांनी सामुपदेशन करून समजावले, नंतर दोघांचे एकत्र सामुपदेशन करून संसारात एकमेकांना कसे सांभाळून घ्यावे ते सांगितले. शेवटी पंचांच्या साक्षीने व प्रयत्नांनी दोघांचे मनोमिलन झाले यावेळी नीशाची साडीचोळीने ओटी भरुन आनंदाने रवानगी केली.
या प्रसंगी सुभाष भंगाळे, संजय पाटील, अनिल वारके, शरद फेगडे, मंगला पाटील, कावेरी चौधरी, संध्या वराडे हजर होत्या.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या, महिला मंडळाची नाव नोंदणी सुरू आहे तरी ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी संपर्क करावा. असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीने केले आहे .