भडगाव (प्रतिनिधी )
भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतुक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधील २ चोरट्यानीं तब्बल ११ वाहनांच्या मोठ्या बॅटरी चोरल्याची घटना शहरात दि.२१ रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असुन मालवाहतुक गाडी धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत त्वरित भडगाव पोलिस पो. कॉ. प्रविण परदेशी, अमजद पठाण यांनी २ तासातच दोघा आरोपींनी मोठया शिताफीने पकडुन जेरबंद केले आहे. यावेळी पोलीस स्टेशनला या सर्व वाहनांच्या मालकांनी एकच गर्दी केली होती.
शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या ग्रीन पार्क कॉलनी येथे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे दि. २१ रोजी रात्री लावलेले होते. यावेळी मध्यरात्री कॉलनीतील दोन चोरटयांनी लबाडीच्या इराद्याने आयशर गाडी व ट्रॅक्टर ९ गाड्यांमधील मधील वेगवेगळ्या एक्साईड कंपनीची अकरा बॅटरी एकूण ५३,००० रुपये किमतीच्या चोरुन नेल्या आहेत. यावेळी पोलीस स्टेशनचे पो.कॉ.प्रवीण परदेशी व अमजद पठाण यांनी सदर तपास चक्र फिरवत २ तासातच आरोपींना तात्काळ जेरबंद बंद केले

. या बाबत फिर्यादी नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी समीर शेख ऊर्फ मुन्ना, शोएब शेख दोन्हीही रा.ग्रीन पार्क कॉलनी भडगाव या दोघांविरुद्ध विरुध्द भडगांव पोलीस स्टेशन गु.र.न.२३५/२०२५. भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदिप चौधरी हे करीत आहेत.


