योग प्राणायमच्या सहाय्याने शरीराच्या आरोग्या सोबत मनही निरोगी ठेवा ! बी के सिंधुदिदी ; योगशिक्षक तथा पर्यावरण मित्र नाना पाटील सर यांनी केले योगाचे मार्गदर्शन ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
21जून, आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्यामागील उद्देश जगातील सर्व चांगल्या गोष्टी निरोगी करणे हा होय म्हणून शरीराच्या आरोग्याची जाणीव सर्वांना आहे, परंतु शरीरासोबत मनही निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. आजच्या जगात माणसाचे मन कमकुवत, अस्वस्थ, अशांत आहे आणि आताही ते मनाला बलवान बनवण्यासाठी निर्माण केले जात आहे. वारशाने मिळालेला राजयोग समजून घेण्यासाठी.
योग म्हणजे काय? योग म्हणजे आत्म्याचा परमात्माशी संबंध. आणि आता शरीराचा मन आणि बुद्धीचा संबंध योगाशी आहे .
असे प्रतिपादन भुसावळ सेवाकेंदाच्या बीके सिंधु दिदी यांनी केले .

या आंतरराष्ट्रीय योग दिनी योगशिक्षक तथा पर्यावरण मित्र नाना पाटील सर यांनी आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायम किती महत्वाचे आहे हे सांगितले व त्यांनी दिर्घश्वसन ओंकार जप कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी सह इतर प्राणायम तसेच काही आसने सुर्यनमस्कार प्रत्यक्ष करून इतराकडूनही करविले .
तसेच सेवाकेंद्रातील बीके ज्योती दिदी, कविता दिदी, कंचन बहन, अंचल पाटील यांनीही सुक्ष्म हालचाली व संगितमय योगा कवायती केले . पांडूरंग मराठे यांनी शिर्षासन करून सर्वांना आश्चर्य केले त्यानीही आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग करा असे सांगितले .
या योगा उत्सवाला सुमारे ३०० भाई बहन सह इतर साधक यांनी ही सहभाग घेतला . अनिल भाई, दिलीप भाई, भरतभाई, गोपाळ भाई यांच्या सह इतरांनीही कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले .