भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील चि.संकल्प देविदास चौधरी तरुणाची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती झाली आहे. सैन्यदलाचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या लेफ्टनंट पदावर नियुक्ती देण्यात आली लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने तेली समाजाच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे.

चि.संकल्प हा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी देविदास चौधरी यांचा सुपुत्र आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल , उच्च माध्यमिक शिक्षण डिफेन्स अकॅडमी संभाजीनगर येथून नॅशनल डिफेन्स अकॅडमी [ NDA ] मध्ये सिलेक्शन झाले. नंतर पुणे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये 3 वर्षे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतले .भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथे 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता 14 जून 2025 पासून लेफ्टनंट कर्नल पदी जालंधर येथे नियुक्ती झाली आहे.
सत्काराच्या कार्यक्रमात चि.संकल्प व त्यांच्या वडिलांनी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चि.संकल्पच्या निवडीमुळे भुसावळ नव्हे तर जळगाव जिल्ह्यात तेली समाजाचे नावलौकिक करून भुसावळच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे. या निवडीमुळे सर्वत्र कौतूक होत असून चौधरी परिवारावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका अध्यक्ष गणेश सोनवणे , विजय अण्णा चौधरी [ कार्याध्यक्ष ] , सुनिल चौधरी सर [ सचिव ] , राकेश रामदास चौधरी [ कोषाध्यक्ष ] ,अनिल विश्वनाथ चौधरी [ संघटक प्रमुख ] , रघुनाथ श्रीधर चौधरी [ ज्येष्ठ सदस्य ] सुभाष दौलत चौधरी [ ज्येष्ठ सदस्य ] , दत्तू गिरिधर चौधरी [ ज्येष्ठ सदस्य ] , तसेच भुसावळ शहर तेली समाज अध्यक्ष संजय श्रावण चौधरी , सुरेश सोनू चौधरी [ उपाध्यक्ष ] ,अशोक नामदेव चौधरी [ सचिव ] ,सुधाकर श्रावण पाटील [ कोषाध्यक्ष ] , सुनिल चौधरी सर [ ऑडिटर ] गणेश सुरेश सोनवणे , बाळू शांताराम चौधरी , दिलीप विश्राम चौधरी ,देविदास रामभाऊ चौधरी , किरण पांडुरंग चौधरी , गोपाळ बळीराम चौधरी ,राकेश रामदास चौधरी , विजय देवराम चौधरी , सुभाष दौलत चौधरी , सुनील विश्वनाथ चौधरी , प्रदीप चौधरी , नरेंद्र चौधरी यासह सत्काराच्या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नामदेव चौधरी यांनी तर आभार सुनिल चौधरी सर यांनी मानले.


