दुर्दैवी ! महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू ; पाचोऱ्यात हळहळ –

जळगाव : माहेरी पासपोर्टच्या कामानिमित्त आलेल्या महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव जवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. डॉ. स्नेहल प्रीतम रावते (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथे माहेर, तर सुरत येथे सासर असलेल्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते (२५) सध्या लंडनमध्ये राहत होत्या. स्नेहल या माहेरी पाचोरा येथे पासपोर्टच्या कामानिमित्त आल्या होत्या. जामनेर येथून वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत दुचाकीने जात होत्या.

दरम्यान, पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव जवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली.
माहिती मिळताच पहूर पोलिस व पाचोरा येथील नातेवाईक पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.