पुणे, – राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यामुळं पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामुळं अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये काही लहान मुळे देखील असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या ठिकाणी बचाव कार्य सुरु झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. याठिकाणी असणारा पूल जूना आहे. त्यामुळं पुलाची क्षमता ही कमकुवत झाली होती असे दिसत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पर्यटक या भागात फोटो घेत होतो. एकाच वेळी अनेक पर्यटक पुलावर आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये २५ ते ३०पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. नागरिकांनी या परिसरात गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या संदर्भात मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन यासंदर्भात लक्ष घालून योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल. स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासनासह अन्य शासकीय विभाग त्याठिकाणी निश्चित मदत करतील. मलाही या संदर्भात संपूर्ण माहिती नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली. पूल कोसळला आणि त्यात सहा जणांचे दु:खद निधन झाले आणि काही लोक वाहून गेली, अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. यासंदर्भात मी अधिक माहिती घेऊन त्याअनुशंगाने जे काही करता येईल, ते केले जाईल. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.


