भुसावळ । प्रतिनिध ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचेकडे सादर केला होता . त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करून दोन जणांना सहा महिन्यासाठी जिल्हयातुन हद्दपारीचे आदेश काढले आहेत . यामुळे शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे .

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख सलीम शेख हमीद ( वय – ५८ रा . पापानगर भुसावळ ) याचे विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अवैधरित्या दारू विक्री करणे, तक्रारदारांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे विविध सात गुन्हे दाखल आहेत . यामुळे शेख सलीम शेख हमीद याला सहा महिने तर याच प्रकारे शेख शाकीर उर्फ गोलु शेख रशिद ( वय – २९ रा . विवेकानंद शाळे मागे, ३२ खोली , भुसावळ ) याचे विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे , जिवे ठार मारण्याची धमकी देणे, अशांतता निर्माण करणे अशा विविध प्रकारचे बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . यामुळे पोलीस प्रशासनाने प्रांताधिकारी यांचेकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता . त्यानुसार प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचेकडे सुनावणी होवूनशेख शाकीर उर्फ गोलु शेख रशिद याला जळगांव जिल्हयातून एक वर्षे हद्दपारीचे आदेश काढले आहेत . अशा प्रकारे भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जण जिल्ह्याबाहेर हद्दपार होणार असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे .


