शिवसेना कोणी संपवू शकत नाही, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच निवडणूका लढणार – उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ

भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूका लढणार आहोत , , शिवसेना कोणीच संपवू शकले नाही व संपवणार देखील नाही असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ.यांनी व्यक्त केला . शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा भुसावळ शिवसेना पदाधिकारी यांनी सत्काराचे आयोजन केले होते. या प्रसंगी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला ..
शनिवार १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्राम गृह येथे आयोजित या सत्कार समारंभास शिवसेना पदधिकारी शिवसैनिक उपस्थित होते . या बैठकीत रावेर लोकसभा संपर्कप्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की शिवसेना कोणी संपवू शकत नाही हे ईव्हिएम मशीनचे सरकार आहे .सर्वसामान्य जनतेत जाऊन पदाधिकाऱ्यांनी काम करावे येणाऱ्या आगामी काळात शिवसेनेचा भगवाI झेंडा फडकवा असे सांगून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात भाष्य केले. तसेच नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
जुने मतभेद बाजूला सारून जोमाने कार्य करा असे आवाहन करून लवकरच नवीन पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हा पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.