भुसावळ (प्रतिनिधी ) – येथे दि.१४/६/२५ रोजी शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख मा.गुलाबराव वाघ यांचा दौरा आयोजित केला आहे.सायं- ५ वा.रेस्ट हाऊस, भुसावळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक व संघटनात्मक संरचना व इतर विषयांवर चर्चा होणार आहे , तरी सर्व शिवसेना (उबाठा ) चे नगरसेवक आजी माजो पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक, दिलीप सुरवाडे भुसावळ.यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .


