भुसावळ ( प्रतिनिधी) –

शिक्षकांनी नेहमीच प्रशिक्षणाच्या – माध्यमातून नव्या संकल्पना – आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि – नवीन शैक्षणिक धोरणांचा स्वीकार करावा. व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रशिक्षणांमधून शिक्षकांनी नव्याचा वेध घ्यायला हवा, असे प्रतिपादन भुसावळ येथील शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी बि.डी. धाडी यांनी केले.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणांतर्गत रावेर मुक्ताईनगर बोदवड व भुसावळ तालुक्यातील बारा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण व 24 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांचे निवड श्रेणी प्रशिक्षण प. क. कोटेचा विद्यालय येथे 2 जून ते 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी धाडी, सुलभक नेहरू विद्यामंदिर तळवेल चे मुख्याध्यापक एस एस अहिरे, केंद्रप्रमुख राजेश पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सुनील वानखेडे, प्राध्यापक श्याम दुसाने, निलेश पाटील, तेजेंद्र महाजन, उपस्थित होती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी दोन जून ते 12 जून दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन असून, 105 शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे.
या प्रशिक्षणाचे तालुका समन्वय विषय तज्ञ शिक्षक संजय गायकवाड व सचिन पाटील आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप सुरवाडे यांनी केले.
300 गुणांचे मूल्यांकन
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात एकाच वेळापत्रकानुसार प्रशिक्षण राबवले जात आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ३०० गुणांचे मूल्यांकन. यामध्ये प्रशिक्षणादरम्यान २०० गुण आणि प्रशिक्षणानंतर १०० गुण यासाठी स्वाध्याय, कृतिसंशोधन, उत्तर चाचणी यांसारख्या विविध साधनांचा वापर होणार होत असून. प्रथमच दिवसभरात चार वेळेस उपस्थिती घेतल्या जात आहे.
किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी



