जळगाव (प्रतिनिधी ) : येथील जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर फायनल वर्गात शेकडा 65% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.
तरी, जळगाव जिल्ह्यातील तेली समाजातील शेकडा 65% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व पासपोर्ट फोटोसह कागदपत्रे तेली समाज मंगल कार्यालय, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे दि. 15 जुलै 2025 पर्यंत जमा करावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश हरदास चौधरी व सचिव नारायण दयाराम चौधरी यांचे तर्फे करण्यात आले आहे.



