भुसावळच्या आर्या फाउंडेशनला राज्य शासनाचा गायकवाड पुरस्कार ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील आर्या बहुद्देशीय सेवा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला सेवाकार्याबद्दल सन २०२३-२४ साठीचा राज्य शासनाचा कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाकडून तसे पत्र आर्या बहुद्देशी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष वंदना वाकचौरे यांना प्राप्त झाले आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढलेली आहे, अशी प्रतिक्रिया यावर वंदना वाकचौरे यांनी दिली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी दिनांक १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइन्ट, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार मिळाला आहे . जिल्ह्यातील एकूण सात संस्थांची व एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड होऊन राज्य व विभागस्तरावर जिल्ह्याने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. जाहीर पुरस्कारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड- भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराचा समावेश आहे.

पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली; वंदना वाकचौरे, अध्यक्षा, आर्या बहुउद्देशीय फाउंडेशन, भुसावळ
” संस्थेच्या माध्यमातून आमचे सेवाकार्य समाजातील शेवटच्या
घटकांपर्यंत सातत्याने पोहोचत आलेले आहे. हा पुरस्कार म्हणजे राज्य शासनाकडून या सेवाकार्याला मिळालेली पावती आहे. मी सरकारला धन्यवाद देते. या पुरस्काराने आमची संस्था म्हणून जबाबदारी अधिकच वाढलेली आहे. पुरस्काराने प्रेरणाही नक्कीच मिळालेली आहे. सेवाकार्याला आणखी जोम या पुरस्कारामुळे येणार आहे.