बेकायदेशीर देशी दारूची विक्री,एकास अटक

भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील जामनेर रस्‍त्‍यावरील रमाबाई आंबेडकर नगर भागात बेकायदेशीर देशी दारुची विक्री होत असल्‍याची गुप्‍त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्‍याने पोलीसांनी आज दि.१२ एप्रिल रोजी दुपारी १२-१५ वाजेच्‍या सुमारास छापा टाकला. यात श्रावण रमेश देवरे(वय३३) रा.रमाबाई आंबेडकर नगर हा स्वत:च्या घराच्या आडोशाला १ हजार ८७२ रू.किमतीच्या देशी दारु सखी संत्रा कंपनीच्या १८० मि.ली.मापाच्या ३६ बाटल्या प्रत्येकी ५२ रू. किंमत असलेल्या बेकायदेशीररित्‍या बाळगून विक्री करीत असतांना मिळून आल्याने त्याच्याविरुध्‍द मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट कलम ६५ (ई)प्रमाणे गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,संदीप परदेशी,एएसआय.तसलीम पठाण,पोना.रविंद्र बि-हाडे,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,तुषार पाटील,महेश चौधरी,पोकाॅ.विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *