मुंबई : दोन लोकल ट्रेन विरूद्ध दिशेने जात असताना पायर्यांवर असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकाला घासल्या जावून आठ प्रवासी खाली पडले व या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना मुंब्रा व दिवा स्थानकादरम्यान घडली.

ही घटना घडल्यानंतर या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळवा ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे.
या अपघाताबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माहिती दिली आहे.
या दोन्ही लोकल ट्रेन होत्या. त्या लोकल एकमेकांपासून विरूध्द दिशेला जात होत्या. फुटबोर्डावरती हे सर्वजण प्रवास करत होते, बॅगमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्यामुळे ते रेल्वेमधून खाली पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माहिती दिली आहे. लोकलमधून लटकलेले प्रवासी शेजारून जाणार्या ट्रेनमधील बॅगेला घासले गेल्यानेजवळपास १० ते १२ लोक लोकल मधून पडल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकलमधून पडलेल्या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात आहे.


