अमळनेर – अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे ठेकेदाराच्या भावाचाा खून करून पसार झालेल्या पाचही आरोपिंना अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील दुर्गम डोंगर भागातून अटक केली आहे.

अमानुष मारहाण करीत केला खून
पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी मजुरांची मध्य प्रदेशातून ने आण करणार्या कैलास शामसिंग प्रजापती याला 29 रोजी मजुरांनी त्यांचे कामाचे पैसे देत नसल्याच्या कारणातून व दुसरे कामगार कामावर आणल्याच्या रागातून लोखंडी पाईप, लोखंडी पहारने हातावर, पायांवर, तोंडावर अमानुषपणे मारहाण केली. कैलास रात्रभर विका सोसायटी कार्यालयात बेशुद्ध पडून होता. सकाळी त्याला उपचारासाठी अमळनेर येथून धुळे व नंतर इंदूरला दवाखाण्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला तर संशयी पसार झाले होते.
एमपीतून आरोपींना अटक
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेड कॉन्स्टेबल विजय भोई, पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपीना अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर तांत्रिक सहाय्याद्वारे गोपाल साहुलाल धुर्वे (35), पंकज उमरावसिंग शिलु (27), सलीम निर्मलशहा धुर्वे (22), रोहित बुद्धसिंग शिलु (19) आणि शिवम फुलसिंग शिलु (18, सर्व रा.बीजाधाना, पो.ईटावा, ता.तामिया, जि.छिंदवाडा मध्यप्रदेश) यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे 100 ते 150 किमी परिसरातून विविध डोंगर दर्यातून अटक केली.


