भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक1 जून 2025 रोजी भुसावळ एसटी बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला . याप्रसंगी भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसेडर नाना पाटील सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. रिदम हॉस्पिटल संचालक गौतम चोरडिया यांनी फूलहार अर्पण केले.सर्वप्रथम सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांताराम चौधरी यांनी सह पत्नी बसची विधिवत पूजा केली. आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी व सहायक कार्यशाळा अधीक्षक सागर देवकर तसेच सुलेमान तडवी लेखाकार यांनी प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना पेढे वाटून त्याचं स्वागत केले. बस स्थानकावर फुलहार केळीची झाडे पताका व रांगोळ्यांनी सजावट करण्यात आलेली होती यानिमित्त एस टी बसला फुगे व पताका लावून सजविण्यात आले होते. नाना पाटील सर व धर्मराज देवकर यांनी आपल्या मनोगतात एस टी महामंडळाची स्थापना 1 जून 1948 ला झाली तेथून 2025 सालापर्यंत महामंडळाने अनेक खाच खळग्यातून प्रवास करत करत 62 लाख प्रवाशांची दररोज वाहतूक सेवा करणारी एकमेव महामंडळ बनले आहे असे सांगितले . सरकारने महिलांना अर्धे तिकीट दरा मध्ये प्रवास योजना सुरू केल्या मुळे एस टी ला नवसंजीवनी मिळालीअसे मत व्यक्त केले . आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी प्रवाशांचे आभार मानले, . याप्रसंगी सुरज पवार, जगन गोसावी, गजानन देवरे, हेमंत चौधरी,, प्रवीण पाटील, इरफान तडवी, सौ.किरण तायडे,नितीन सोनवणे, तुलसी करौसिया, किशोर आंबोले ,रफिक पिंजारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जितेंद्र डोळसे, सुधीर पाटील, अनिल सपकाळे, अमर तडवी,अनिल नागपुरे, एम डी बढे,भूषण महाजन, डी ए इंगळे यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन धर्मराज देवकर यांनी केले. प्रवाशांना प्रवास योजनांची माहिती आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली.



