सुरत मधील तरुणीवर बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा जळगाव मध्ये बलात्कार


जळगाव, – लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाने जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे .

सदर तरुणी सुरत येथे नोकरीला असून जळगाव येथे आली असता तिला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात राहणाऱ्या विनोद शिवराम कुसळकर. वय ३५ वर्ष. याने दि. १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान जळगाव रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या संदर्भात तरुणीने दि. १ जून रोजी रात्री ११. ४२ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनुसार विनोद शिवराम कुसळकर. वय ३५ वर्ष. तालुका मेहकर, जि. बुलढाणा या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.