भुसावळात तीन हजारांची दारू जप्त ; दोघांविरुद्ध कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
देशात कोरोनाचे पार्श्वभूमीवर संचारबंदी (लॉक डाऊन ) च्या काळात मदयविक्री बंद असून सुद्धा अनेक ठिकाणी चोरुन दारू विक्री होत आहे .
येथील राष्ट्रीय महामार्गावरील चाहेल ढाब्यावर शुक्रवार रोजी रात्री 11.30 च्या सुमारास अवैधरीरत्या दारूची विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्याने त्यांनी छापा टाकून 3120 /- रूपये किमतिच्या डिप्लोमेट कंपनीच्या 360, एम.एल.मापाच्या कंपनी सिल बंद 12 बाटल्या ज्यावर 260 रु प्रत्येकी किंमत असलेल्या, विना परमिट विदेशी दारू जप्त केली. संचारबंदीच्या काळात सर्वत्र बंद असतांना दारू विक्री होत असल्याने पोलिसांनी कारवाई करीत ढाब्याचे व्यवस्थापक कडू तुळशीराम पाटील (जुना सातारा, भुसावळ) लखन एकनाथ घावरे यांना अटक करून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहिती डीवायएसपी गजानन राठोड यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना कारवाईच्या सूचना केल्यात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहायक निरीक्षक संदीप परदेशी, सहायक फौजदार तस्लीम पठाण, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, महेश चौधरी, रवींद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील यांनी शुक्रवारी रात्री ढाब्यावर छापा टाकून तीन हजार 150 रुपयांची विदेशी दारू जप्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *