मांडवेदिगर येथे कोरोना विनाशक हवन याग

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील मांडवेदिगर येथून जवळच असलेल्या सुर नदीच्या काठावर हनुमान मंदिरावर तीन दिवशीय कोरोना विनाशक हवन याग करण्यात आले. सदर हवन याग गुरूदेव सेवा आश्रमाचे गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले असून या व्हायरसवर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: रविवारी ९ मिनिटे लाईट बंद करून घरासमोर दिवे लावण्याचा व मंत्रोच्चाराचा कार्यक्रम घेतला होता. तसेच ठिकठिकाणी होम हवन, पुजा-अर्चा, सोशल डिस्टन्सींग तसेच अनेक नियमांचे बंधन पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या जाहिराती करून लोकांना घरात थांबण्याचे आवाहन सरकार मार्फत करण्यात येत आहे. यासाठी सोशल डिस्टन्सींग ठेवत येथील हनुमान मंदिरावर कोरोना विनाशक हवन याग करून पवनपुत्राला या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शक्ती देवो ‘‘संकट कटे मिटे सब बिरा जो सुमिरो हनुमंत बलबिरा’’ अशी प्रार्थना करून हवन उत्साहात पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *