यंदाची भीम जयंती घराघरात साजरी करा- विनोद सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी )-
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची जयंती ही संयुक्तरित्या मोठ्या थाटामाटात साजरी करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे.यंदा मात्र संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही आपापल्या घरा घरात साजरी करा असे आवाहन वंचित बहुजन महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि,महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन्ही महापुरुषांच्या जयंती संयुक्तपणे साजरी करण्याची जी प्रथा आहे ती या वर्षी साजरी न करता अगदी साधेपणाने व आपापल्या घरी राहून साजरी करावी त्यासाठी महापुरुषांच्या जीवन व साहित्याचे वाचन,घरात बुद्ध पूजा पाठ,भीम स्तुतीचे पठन,सामुहिक रित्या रस्त्यावर येवू नये,एकत्र जमून लॉक डाऊनचे उल्लंघन करू नये, कारण कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी गर्दी न करणे आवश्यक आहे .प्रशासन कोरोनाची दृष्ट साखळी तोडण्यासाठी घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे.लोक रस्त्यावर ,सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले तर कोरोनाचा फैलाव होवू शकतो म्हणून आपण सर्व फुले,आंबेडकरी प्रेमींनी देशाचा विचार करत यंदाची भीम जयंती घराघरात साजरी करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *