नाहाटा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती

भुसावळ -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती आदरणीय ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या आदेशाने करण्यात आली असून प्रा.डॉ.बऱ्हाटे 1991 सालापासून महाविद्यालयात विद्यादानाचे काम करीत असून त्यांचे एमसीएस एमबीए आणि पीएचडी असे शिक्षण झालेले आहे. त्यांचे मूळ गाव वाघळी असून ते आजपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात BOEआणिBOS मेंबर सुद्धा राहिलेले आहेत त्यांचे शिक्षण चाळीसगाव आणि पुणे येथे झालेले आहे महाविद्यालयात 2017 पासून ते उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते तर आय एम सी डी डायरेक्टर म्हणून त्यांनी 2005 ते 2017 पर्यंत यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाकडून आणि संपूर्ण भुसावळ शहर व परिसरातून कौतुक होत आहे