भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्याचे माजी आमदार तथा’ श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चौधरी यांच्यावतीने शहरासह तालुक्यातील गरजु हातमजूर परिवाराला घरपोच जीवनावश्यक वस्तु मिळत आहे. आजपावेतो सुमारे 5 हजारावर परिवाराला मदत केली असून मदतीचा ओघ असाच सुरुं राहणार असून मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तु वाटपाचे मदतकार्य शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरुं आहे.
कोणीही वंचित राहणार नसल्याचे यूवानेते सचिन चौधरीं यांनी सांगितले . दरम्यान गुरुवारी शहरातील जामनेर रोडवरील प्रभाग 9 मधील गोरगरीब व हात मजुरी करणाऱ्या सुमारे दोनशे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
संचारबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही ओघाने मोलमजूरी नाही ,कामधंदे बंद असल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र अश्या निराधार गरजुंचा भक्कम आधार म्हणून एक हात मदतीचा देवून त्यांचे हाल होऊ नये याकरिता माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्यावतीने गोरगरिबांसाठी सातत्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे .
या अनुषंघाने येथील गब्बर चावरीया, रणजीत चावरिया, अशोक पथरोड ,जगदीश तुरकले, सोनू बारसे, प्रवीण खंडारे ,दिनेश पचरवाल ,यांचे सहकार्याने घरोघरी जाऊन गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे गुरुवार रोजी वाटप केले . शहर व तालुक्यातील नागरिकांना घरपोच सेवा देवून सहकार्य करीत असल्याने त्यांच्या चुली पेटत आहे व अश्या परिस्थितीत मुखात दोन घास मिळत आहे यासाठी संतोषभाऊ चौधरी व सहकारी यांचे तालुक्यातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.



