भुसावळ (प्रतिनिधी )
घरगुती इलेक्ट्रिक बील व लहान व्यवसाय करणाऱ्या व्यापाराचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे अशी मागणी दीपक धांडे , यांनी गुरुवार ९ एप्रिल रोजी भुसावळ मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र वितरण कंपनी यांना निवेदन देवून केली आहे.
कोरोना व्हायरस मूळे सध्या संपूर्ण देशामध्ये शासनाच्या वतीने लॉक डाऊन करण्यात आलेले आहे आणि त्याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रामध्ये बसत आहे कारण सर्वात जास्त कोरिना बाधित पेशंट हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या मुळे आज सामान्य माणसाला जीवन जगणे असह्य झाले आहे सर्व लहान मोठे व्यवसाय बंद पडलेले आहे. त्यामुळे सर्व लहान व्यवसाय करणाऱ्याची मार्च , एप्रिल ,मे या तीन महिन्याचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे , तसेच लॉक डाऊन मुळे सर्व कंपनी कामगार, बांधकाम कामगार , रिक्षाचालक , ट्रक चालक, आईसक्रीम विक्रेते, बर्फ विक्रेते ,मॅकेनिकल , असे अनेक लहान मोठे कामगार गेल्या १५ दिवसापासून घरीच बसून आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या परिवाराचा उदर निर्वाह करण्या करिता नाकेनाऊ आलेले आहे अशात जर महावितरण कंपनीचे इलेक्ट्रिक बिल भरण्याची वेळ आली तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला महाराष्ट्रातील जनतेचे इलेक्ट्रिक भरण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करावी व
महाराष्ट्र राजाचे ऊर्जा मंत्री व महाराष्ट्र राजाचे संवेदनशिल मुख्यमंत्री यांनी आपल्या राज्यातील जनतेला मार्च, एप्रील,व मे महिन्याचे घरगुती इलेक्ट्रिक बिल व लहान व्यापाराचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे व जनतेच्या ह्रुदयात कायम स्वरुपी स्थान निर्माण करावे व जनतेला न्याय द्यावा अशी मागणी मा नगरसेवक दीपक धांडे मा नगरसेवक अँड.नरेंद्र लोखंडे ,सागर वाघोडे , योगेश कोलते यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
आणि निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आल्याचे
दीपक धांडे यांनी कळविले आहे .



