सुरत-भागलपुर दरम्‍यान विशेष पार्सल मालगाड़ी धावणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या दुष्प्रभाव व लॉकडाऊन मुळे आवश्यक साधन सामग्रीची वाहतुक करण्यासाठी रेल्‍वे प्रशासनाने सुरत-भागलपुर दरम्‍यान विशेष पार्सल मालगाड़ी चालवण्‍याचा निर्णय घेतल्‍याची माहिती भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागातर्फे देण्‍यात आली आहे . ज्या लोकांना जिवनावश्‍यक साहित्‍य पाठवयाचे असेल त्यांनी आपल्या जवळच्या रेल्‍वे स्थानकावर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकड़े संपर्क करावा मागणी नुसार गाड़ीची फेरी वाढविण्यात येणार आहे
यात सुरत-भागलपुर दरम्यान विशेष पार्सल गाडी ( २फेरी)
गाडी क्रमांक ००९१७ डाऊन ही गाडी दि.१० व १२ एप्रिल रोजी सुरत स्थानकावरून सकाळी १० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी भागलपुर येथे ६-४०वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ००९१८ अप भागलपूर-सुरत पार्सल गाडी ही दि.१२ व १४ एप्रिल रोजी भागलपुर स्थानकावरून ४ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १ वाजता सुरत पोहोचेल
डाऊन दिशेत ही गाडी नंदुरबार,जळगाव, भुसावळ,इटारसी,जबलपूर , कटनी,प्रयागराज,छिवकी,पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर,दानापूर,पटना,क्यूँल
तर अप दिशेने भुसावळ,जळगाव,नंदुरबार आदी स्‍थानकांवर थांबा घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *