प्रा. डॉ. दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळाच्या विभागीय संघटक म्हणून नियुक्ती


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन सुपडू राणे यांची नुकतीच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या विभागीय संघटक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या निमित्ताने अलिबाग येथे झालेल्या राज्यस्तरीय विभागीय संघटकांच्या विशेष सहविचार सभेत त्यांचे स्वागत करण्यात आले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही राज्यशासनाची मान्यताप्राप्त अनुदानित संस्था (एन जी ओ) आहे. ही संस्था १९५८ सालापासून “मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती” ह्या माध्यमातून राज्यभर व्यसनमुक्ती साठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचे कार्य करीत आहे.
प्रा डॉ दयाघन राणे यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून भुसावळ शहर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्षेत्रात अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याआधी व्यसनमुक्ती प्रकल्पांचा ही सहभाग होता. प्रत्यक्ष नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य साठी पी राणे यांनी मागच्या वर्षाच्या सुरुवातीपासून काम पाहिले. जळगाव जिल्ह्यातील त्यांनी केलेल्या कार्याचे आणि प्रकाशित झालेल्या लेख आणि साहित्याची दखल घेऊन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकारी मंडळाने दिनांक ११ मे २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत प्रा राणे यांची नाशिक विभागीय संघटक म्हणून नियुक्ती केली.
नाशिक विभाग संघटक म्हणून कार्य करीत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांच्या कडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यांमधील व्यसनमुक्ती कार्याची जबाबदारी असेल. त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या राज्य कार्यालयाचे मुख्य संघटक श्री अमोल मडामे, सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि चिटणीस श्री चंद्रकांत चौधरी यांचे सह राज्य कार्यकारिणी ने अभिनंदन केलेले आहे.

फोटो ओळ – प्रा डॉ दयाघन राणे यांचे संविधानाच्या कलम ४७ ची प्रत देऊन स्वागत करताना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुख्य संघटक श्री अमोल मडामे, राज्य सरचिटणीस श्रीमती वर्षा विद्या विलास आणि महाराष्ट्र राज्य कार्य समन्वयक श्री मिलिंद पाटील