रेड स्वस्तिक सोसायटी महिला कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी सौ मनिषा पाटील यांची निवड ;

जळगाव –

रेड स्वस्तिक सोसायटी या मानवतावादी आरोग्य सेवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेची प्रथमच जळगाव जिल्हा महिला शाखा टी एस भाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीत रेड स्वस्तिक महिला शाखेची जिल्हास्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ मनिषा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली या
बैठकीला रेड स्वस्तिक चे भारताचे सह महाव्यवस्थापक अशोक राव शिंदे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जे बी पाटील ,राष्ट्रीय संचालक नंदू रायगडे दीप पाटील, जिल्हा समन्वयक डॉ धनंजय बेंद्रे, संचालक सत्यनारायण खटोड, पत्रकार शेखर पाटील, संजय आवटे, प्रतीक जाधव, जिल्हा सचिव डॉ गणेश पाटील डॉ प्रमोद आमोदकर ,आनंदराव मराठे, शरद पांडे सौ कविता झाल्टे ,राहुल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली अध्यक्ष सौ मनिषा पाटील, उपाध्यक्ष एडवोकेट सीमा जाधव, सौ आशा मौर्य, सचिव सौ नीता वानखेडकर, सहसचिव श्रीमती ज्योती राणे, कोषाध्यक्ष श्रीमती वंदना मंडावरे, सह कोषाध्यक्ष सौ माधुरी शिंपी, प्रसिद्धीप्रमुख सौ नेहा जगताप, प्रकल्प प्रमुख सौ मंजुषा अडावदकर.
संचालक
सौ नूतनतास खेडकर किमया पाटील, शिल्पा बयास ,हर्षाली तिवारी, हर्षा गुजराती ,रेणुका हिंगू .
यावेळी राहुल सूर्यवंशी यांची कार्यकारी प्रकल्प संचालक म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमास रेड स्वस्तिक चे मार्गदर्शक शशिकांत धांडे, जिल्हाध्यक्ष एडवोकेट राजेश झाल्टे, नरेश चौधरी यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले