रावेर( प्रतिनिधी) . रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक तक्षशिला बुद्ध विहार रावेर येथे दु. 12.वाजेला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ ईखारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली यावेळी आंबेडकरी व्हाईस फोरम मीडिया चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाशजी सरदार , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे जिल्हा संघटक रमेश खंडारे हे सुद्धा उपस्थित होते या बैठकीमध्ये रावेर तालुक् यातील समस्या व अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .आणि रावेर तालुका कार्यकारणी संदर्भात विचार विनिमय करून लवकरात लवकर रावेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे ठरले. या बैठकीला बाळू शिरतुरे, नगीनदास इंगळे सर ,संतोष कसोदे, राजेंद्र अटकाळे ,राहुल गाढे, प्रशांत गाढे, प्रशांत सवरणे, रमेश अवसरमल, विजय अवसरमल विनायक जवरे ,उमेश तायडे, विजय भोसले ,सदाशिव निकम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
बैठकीचे सूत्रसंचालन बाळू शिरतुरे यांनी केले. तर आभार राहुल गाढे यांनी मानले



