भुसावळ: (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भुसावळ नगरपालिका अग्निशमन दला तर्फे आग लागल्यावर काय करावे याचे प्रात्याशिके विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दाखवण्यात आले.यावेळी बिल्डिंगवर आग लागल्यावर आगीतून अडकलेल्यांना कसे बाहेर काढावे याचा डेमो दाखवण्यात आला.तसेच उंच दोन बांधून आगीत अटकलेल्यांना कसे बाहेर काढावे हे दाखवण्यात आले. इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी च्या सर्व विदयार्थ्यांना अग्निशामक यंत्राची अतिशय उत्तम पध्दतीने माहिती सांगीतली. सर्व शिक्षक व विदयार्थ्यांना चांगल्या पध्दतीने उपयोग करता येईल. विदयार्थ्यांना आग लागल्यावर त्या पासुन बचाव करण्याची व आपत्तीच्या वेळी काय करावे व स्लाईड शो,व्याख्यान व प्रात्यशिकांव्दारे विदयार्थ्यांना माहिती प्रविन मिठे ,दिनेश पुरोहीत,गौरव सपकाळे यांनी प्रात्याक्षीके करुण दिली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.तर सराव करून घेताना विद्यार्थी
फोटो कॅप्शन – अग्निशमन दलातर्फे ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मार्गदर्शन करताना कर्मचारी सोबत उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर.



