पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली;

.
भुसावळ (प्रतिनिधी ) – :येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहलगाव येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना बुधवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी व विद्यार्थ्यांनी कॅण्डल लावून दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी प्रिन्सिपल निना कटरल यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये श्रद्धांजली वाहताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत विद्यार्थी.