भुसावळात जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण ; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ! –

भुसावळ – भुसावळ शहरातील देना नगर परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिचा मुलगा आणि सुन यांना परिसरात राहणाऱ्या सहा जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १६ रोजी रात्री ८ वाजता घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुरुवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळातील देना नगर परिसरात मुन्नीबाई हंसराज पाशी (वय ५८) या महिला आपला मुलगा अभय आणि सून रिमझिम यांच्यासह वास्तव्याला आहेत. १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून या परिसरात राहणाऱ्या नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शीतल सुरवडे यांच्यासह इतरांनी मुन्नीबाई पासी यांना आणि त्यांचा मुलगा आणि सून यांना बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच महिलांना केस ओढून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. या संदर्भात मुन्नीबाई पासी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शीतल सुरवाडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. तेजस परिसर करत आहेत.