भुसावळ (प्रतिनिधी ) –
समाजहिताची भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ यांच्यातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. तरुण वर्गासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची दृष्टीने भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ युवक मंडळाची स्थापना करण्यात आली.
यावेळी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक मंडळाची सुभाषचंद्र भंगाळे आणि धीरज पाटील यांनी कार्यकारणी जाहीर केली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष सागर वाघोदे,
सचिव अमोल महाजन,
सहसचिव शेखर धांडे,
उपाध्यक्ष पवन बाक्षे, सुमित बऱ्हाटे, सागर सरोदे, शिशिर जावळे, जीवन वारके, पवन भोळे, खजिनदार प्रवीण पाटील, सहखजिनदार अश्विन लोखंडे,
कार्यकारणी सदस्य
अमोल पाटील, गौरव महाजन, ललित भोळे, यश फालक, वरद फालक, श्रेयस इंगळे, विकास पाटील, हर्षल बोरोले, निलेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील तरुणांना नवीन दिशा मिळेल अश्या प्रकारचे कार्यक्रम भविष्यात राबविले जाणार आहे तसेच सदस्य नोंदणीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.




