निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने केले पशुपक्षांसाठी 200 परळ वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ व नारीशक्ती व उद्देशीय संस्था यांच्या वतीने रणरणत्या उन्हात पक्षी मित्र वाचवण्याच्या उद्देशाने पक्षांसाठी परळ वाटप हा उपक्रम काव्यरत्नावली चौकात राबविण्यात आला. स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून व राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी 200 परळ वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते मामांनी दरवर्षी सुरू असलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच पावसाळ्यात पक्षांसाठी घर वाटप करण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी केले.
यावेळी डॉ गणेश पाटील, डॉ जयश्री देवरे,किमया पाटील, वंदना मंडावरे, रेणुका हिंगू, आशा मौर्य, हिमाली परमार,हर्षा गुजराती, माधुरी शिंपी, शोभना मकवाना उपस्थित होते तर आभार मंजुषा अडावदकर यांनी केले