जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी;

जळगाव, –

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या संदर्भातला मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकारी यांना जीवे मारू असा मेल मधील आशय असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल पाठवला गेला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेला दुओजोरा दिला आहे.