स्वामिनी फाउंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेत सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; चैत्राेत्सवाला सांस्कृति काेंदण : महिलांच्या कलात्मकतेला मिळाली दाद, अभूतपूर्व प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. महिला स्पर्धकांच्या कलात्मकतेचे दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून घडले. उखाणा स्पर्धेत मृणाल गाडगीळ प्रथम, साधना माेहरील द्वितीय, स्वाती गाजरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका साेनल महाजन तर प्रमुख पाहुण्या समाजसेविका डाॅ. छाया देशमुख या हाेत्या. वेशभूषा व उखाणे स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांना पारिताेषिके देण्यात आली. त्यानंतर लकी ड्राॅ काढण्यात आला. त्यात ज्याेती चाैधरी प्रथम, साधना माेहरील द्वितीय, प्रीती चाैधरी यांना बक्षिसे लागली. परीक्षक म्हणून डाॅ. भाग्यश्री भंगाळे, राजश्री देशमुख यांनी काम पाहिले. सूत्रंसंचालन राजश्री देशमुख, प्रास्ताविक उज्ज्वला बागुल, फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चाैधरी यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती मनाेगतात सांगितली . आभार विजया निकम यांनी मानले. कार्यक्रमाला मेंबर अजिता वडनेरे, आरती ठाकूर, रीना गायकवाड, पल्लवी जाधव, कविता महाले, अनिता इंगळे, जया इंगळे, उज्ज्वला पाटील, अमिता जाेशी, वैशाली भाकरे यांची उपस्थिती हाेती.

यशस्वीतेसाठी यांनी घेतली मेहनत
चैत्राेत्सवासाठी स्वामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चाैधरी, उपाध्यक्षा विजया निकम, सचिव उज्ज्वला बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मेंबर अजिता वडनेरे आरती ठाकूर, रीना गायकवाड, पल्लवी जाधव, कविता महाले, अनिता इंगळे, जया इंगळे, उज्ज्वला पाटील, अमिता जाेशी, वैशाली भाकरे व सदस्यांनी परिश्रम घेतले.