तालुक्यातील खडका साकरी येथे जुगार खेळणाऱ्यां ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; 5 मोटरसायकल व चारचाकीवाहनासह एकूण साडेपाच लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील खडका ते साकरी रोडवर आडोश्याला तालुका पोलिसांनी मंगळवार ७ रोजी धाड टाकून धडक कारवाई करुन जुगार खेळणाऱ्यां ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच मोटरसायकल व एका फोरव्हीलरसह सुमारे साडे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
तालुक्यातिल खडका साकरी येथे जुगार खेळणाऱ्यां पत्रांच्या शेडच्या मागच्या बाजूस आडोश्याला तुषार पांडुरंग घ्यार, माधव रामा वारके ,सुमंत संतोष मेघे ,उमाकांत रमेश भारंबे ,विनोद रमेश सोनवणे , दिलीप शरद फालक ,प्रमोद सोपाण वारके ,कुंदन रामकृष्ण भारंबे ,संजय रामदास चोपडे हे झना मन्ना माग पत्यावर पत्ता जुगाराचे खेळ खेळताना रोख रुपये व पत्ता जुगाराची साधने तसेच त्यांच्या ताब्यातील पाच मोटर सायकली व एक चारचाकी वाहनासह 5 लाख 57 हजार 700 रुपये किमतीच्या मालासह मिळून आले तसेच संचारबंदी असून सुद्धा आदेशाचे उल्लंघन केले म्हणून मुबई जुगार कायदा कलम 12(अ) सह भादवि कलम 270 ,271 ,188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, पो हे कॉ युनूस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे, प्रेमचंद सपकाळे ,विजय पोहेकर, प्रदीप इंगळे ,यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *