कृषी यंत्रसामुग्री व दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊन काळात सुरु राहणार

जळगाव – शेतक-यांच्या अडचणी विचारात घेता जिल्ह्यातील कृषि यंत्रसामुग्रीची, सुटे भागाची व दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरु ठेवावीत.
करोना विषाणु प्रादुर्भाव प्रतिबंध/ नियंत्रणासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आणि भविष्यात निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. विक्री व दुरुस्ती दुकानांमध्ये कोणत्याही परिस्थितीत चारपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक व्यक्तीमध्ये मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दोन मिटर अंतर ठेवण्यात यावे. विक्री व दुरुस्तीकरीता येणा-या व्यक्तींना तोंडाला मास्क किवा रुमाल बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे, विक्री केंद्रावरील कर्मचा-यांनी देखील तोंडाला मास्क लावावे. विक्री व दुरुस्ती दुकानांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी साबण/ हॅण्डवॉश व सॉनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. विक्री व दुरुस्ती दुकानांचे नियमितरित्या निर्जंतुकीकरण करुन स्वच्छता पाळण्यात यावी.
या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय मार्गदर्शक सुचनाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. या सूचनांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे जळगाव जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *