मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली. या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत आहे.

जुलै 2024 ते मार्च 2025 महिन्यापर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले असून, आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आखाजीचा सण लाडक्या बहिणींसाठी अधिक गोड होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
अक्षयतृतीयेला लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या खात्यावर जमा होतील, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.


