पारोळा –
पारोळा शहराजवळील नॅशनल हायवे वरील म्हसवे शिवारात अहमदाबाद येथून अमरावती येथे गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या कंटेनर वर नाशिक येथील आय जी पथक व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत लाखो रुपयांचे गुटखा व सुगंधी तंबाखू रंगेहाथ पकडले यात सुमारे पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की
दिनांक ७ रोजी पारोळा शहराजवळील नॅशनल हायवे वरून गुटखा घेऊन कंटेनर जाणार असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर नाशिक येथील आय जी पथक व पारोळा पोलीस सदर जागी
दाखल झाले यावेळी साधारण सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारात जी जे २३ वाय ९३७३ कंटेनर दाखल झाले असता पोलिसांनी कंटेनरला अडवून कंटेनर ची झाडाझती घेतली असता पुढील भागात कंटेनर मध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या झोल्यात सुगंधी तंबाखू गुटखाजन्य पदार्थ ठेवलेल्या अवस्थेत असलेले आढळून आले या सुगंधी युक्त तंबाखू गुटख्या ची किंमत साधारण ५० लाखाच्या जवळपास असल्याची माहिती मिळाली असून याबाबत कंटेनर ट्रकवरील चालक भरत वीरसिंग वाळवंट ३५ दावत जिल्हा गोधरा, गुजरात याला ताब्यात घेण्यात आले असून सुगंधी तंबाखू व गुटखाजन्य पदार्थ हा गुजरात मधून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उतरणार होता

रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, हे कॉ डॉ शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, किशोर भोई, आदींनी कारवाई केली पंचनामा करण्याचे काम सुरू रात्री उशिरापर्यंत सुरू होते सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.


