बचतगटाच्या सी.आर.पी महिला यांच्या उल्लेखनीय कार्याचा स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान ; राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटाच्या सी.आर.पी यांच्या उल्लेखनीय कार्या बद्दल भुसावळ शहर व ग्रामीण भागातील ११ महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने तालुकास्तरीय स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे हे ३ रे वर्ष असून दि.४ एप्रिल २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती भुसावळ येथे दुपारी.१ वाजता. करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीसौ.सविता अहिरे नगरसेविका नगरपरिषद भुसावळ व प्रमुख पाहुणे सौ.अलका शिरसाठ समुदाय संघटक नगरपरिषद भुसावळ,सौ.वंदना शंकपाल सिटी लेव्हल फेडरेशन अध्यक्ष मैत्री सागर महिला शहर संघ बहुउद्देशीय संस्था, सौ.संगिता भामरे दक्षता समिती सदस्य बाजारपेठ पोलिस स्टेशन भुसावळ,ॲड.प्रिया अडकमोल , उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले. फाउंडेशन च्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत डायरी व पेन भेट देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी सांगितले की यावर्षी कार्यक्रमाला काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब झाला असून सदर कार्यक्रम रद्द न करता उशीरा घेणार असे ठरवले व आज रोजी कार्यक्रम घडवून आणला कार्यक्रमचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी पुरस्कारासाठी भुसावळ शहर व भुसावळ तालुक्यातील विविध गावांमधील बचतगटाच्या सी.आर.पी यांच्या कर्तृत्वान अशा उत्कृष्ट महिलांची निवड करण्यात आली. तळागाळातील महिलांचे बचतगट स्थापन करुन महिलांनी त्यांचा उद्योग व्यवसाय करावा यासाठी महिलांना प्रोत्साहन देवून कर्ज मिळवुन देण्यासाठी तसेच महिलांना उपजिविका ची माहिती देणे असे समाजपयोगी कार्य सी.आर.पी च्या महिला करत असतात अशा चांगल्या प्रकारे काम करणा-या भुसावळ व भुसावळ तालुक्यातील विविध गावांमधील जवळपास ११ सी.आर.पी महिलांना स्री शक्ती पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करणार असून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची निवड करुन अशाच पद्धतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे राजेश्री सुरवाडे यांनी सांगितले.यानंतर प्रमुख पाहुणे वंदना शंकपाल यांनी महिलांना महिला जागतिक दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या,ॲड.प्रिया अडकमोल यांनी मनोगत व्यक्त करतांना महिलांच्या कार्याचे कौतुक केले व छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं होतात व कोर्ट केसेस होते म्हणून सोशल मिडिया चा चांगला वापर महिलांनी करावा याविषयी कोर्टात अनुभवलेल्या केसेस बद्दल माहिती देवून बहुतांश वाद हा फोन वडिल संवादातून होत असतांना समजते परंतु आपण परिसरातील वादविवाद आपसात मिटवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जेणे करून कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही अशी भावना व्यक्त करून सर्वांनी अशाच पध्दतीने काम करून परिवाराला हातभार लावावा हि काळाची गरज आहे असे सांगितले.

यानंतर अलका शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन ने बचतगटाच्या क्षेत्रातील सी.आर.पी अशा ११ महिलांची आज महिला जागतिक दिनानिमित्त पुरस्कार देणार खरच हे खुप छान वाटले फाउंडेशन चे कार्य मी अनेक वर्षांपासून पाहते खुप छान उपक्रम फाउंडेशन च्या माध्यमातून समाजहितासाठी केले जातात व आजचा कार्यक्रम तळागाळातील महिलांना उद्योग व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी सी.आर.पी चे योगदान खरोखरच महत्वाचे आहे विदेश म्हणजे यामाध्यमातून महिलांना बैंकेची आर्थिक देवाणघेवाण देखील समजायला लागली आहे व फाउंडेशन चे आभार मानले कि आपण अशा कर्तृत्ववान महिलांची पुरस्कारासाठी निवड केली यासाठी फाउंडेशन चे आभार मानले व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या नंतर संगिता भामरे यांनी उपस्थित महिलांना महिला जागतिक दिना निमित्त शुभेच्छा देऊन प्रत्येक महिलेनी बोलके व्हावे आजची महिला हि विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान निर्माण केले व आपणही यापुढे असेच चांगले कार्य करावे शुभेच्छा दिल्या,

अध्यक्षस्थानी सविता अहिरे नगरसेविका यांनी महिला जागतिक दिवस आपण का साजरा करतो याची माहिती दिली व आज महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन व्हावे आणि आज चा पुरस्कार सोहळा हा खरा अर्थाने तळागळातील महिलांना त्यांच्या कार्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी उर्जा देणारा आहे. आज रोजी ईथे महिलाना पाहून आनंद झाला खरंच योग्य महिला पुरस्कारासाठी मानकरी ठरले सर्वांनचे कौतुक करून महिलांना ८ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करून फाउंडेशनला जेव्हा कधी मदतीची गरज लागल्यास मी मदत करेल असे सांगितले.

 यानंतर उपस्थीत पुरस्कारार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले पुरस्कार स्विकातांना स्वता प्रत्येक पुरस्कारार्थी महिलांनी आपल्या कार्याची माहिती सांगत  स्वताचे किती बचतगट आहेत व काम करत असतांना आलेल्या अडचणी व त्यावर काढलेला मार्ग याविषयी माहिती दिली.

सदर पुरस्कारासाठी ११ सी.आर.पी पुरस्कारार्थी महिला भुसावळ शहरा मधिल कविता ठाकूर, रोहिणी पाटील , पल्लवी वाघोदे, तसेच भुसावळ तालुका मधिल मंगला भोळे,अनिता कोळी कंडारी गाव, नुतन सपकाळे साकेगाव, वैशाली सपकाळे कु-हे पानाचे गाव, प्रतिभा जावळे साक्री गाव, राणी सोनटक्के गोजोरा गाव,ललिता महाजन कन्हाळा गाव, साधना धांडे शिंदी गाव अशा प्रकारे महिलांना स्री शक्ती पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले

. दरम्यान पुरस्कारार्थी महिलांनी पुरस्कार मिळाल्या बद्दल फाउंडेशन चे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोढते यांनी केले व कार्यक्रमाचे शेवटी आभार फाउंडेशन निर्मला सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सदस्य सुजाता सपकाळे, माधुरी सपकाळे यांनी सहकार्य केले.