मध्य रेल्वेचे ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचे हस्ते संरक्षा पुरस्कार देऊन गौरव ;

मुंबई। — मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी दि. ०२.०४.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ३, पुणे विभागातील ४, सोलापूर विभागातील २, भुसावळ विभागातील १ आणि नागपूर विभागातील १ अशा ११ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार देऊन गौरव केला.

मागील महिन्यांत संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्या दाखवलेली सतर्कता, अनुचित घटना रोखण्यात आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारात पदक, प्रशंसापत्र, अनुकरणीय संरक्षा कार्यासाठी प्रशस्तिपत्र आणि २०००/- रू. रोख बक्षीस समाविष्ट आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे

मुंबई विभाग

१. श्री प्रीतम कुमार यादव, लोको पायलट, कुर्ला, मुंबई विभाग यांनी दि. ०८.३.२०२५ रोजी दादर यार्ड येथे प्रशिक्षण सत्रादरम्यान, आगीमुळे थांबलेल्या रेकच्या रिकाम्या कोचमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब कार्यरत असलेल्या स्टेशन मास्टर आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांना कळवले. पॉइंट्समन आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत झाली.

२. श्री रोहित यशवंत कोळी, ट्रेन व्यवस्थापक, पनवेल, मुंबई विभाग, दि. २३.२.२०२५ रोजी मालगाडी मध्ये कार्यरत असताना, त्यांना दातिवली-डोंबिवली विभागातील ४७-०७ किमी वर लगतच्या ट्रॅकवर एक लोखंडी रॉड पडलेला दिसला. त्यांनी धोक्याचा इशारा देऊन प्रभावित ट्रॅकवर येणारी भुसावळ- पनवेल ट्रेन ताबडतोब थांबवली. लोखंडी रॉड काढून टाकण्यात आला आणि भुसावळ- पनवेल ट्रेन सुरक्षितपणे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

३. श्री कुणाल पारिसकर, पॉइंट्समन, लोणावळा, मुंबई विभाग, दि. १८.२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना, ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद-मुंबई अतिजलद एक्सप्रेससोबत सिग्नलची देवाणघेवाण करताना, त्यांना कोच क्रमांक ए३ मधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब स्टेशन मास्टरला कळवले आणि कोच वेगळा करण्यात आला आणि ट्रेन सुरक्षितपणे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

भुसावळ विभाग
४. श्री नरेंद्र एस गावशिंदे, सातमा, भुसावळ विभागातील कनिष्ठ अभियंता (कॅरीज आणि वॅगन) दि. १८.०२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना एका मालगाडीच्या वॅगनचा ग्रीस सील सैल अवस्थेत आढळला जो सामान्य तपासणीत सहसा दिसत नाही. त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यांच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

५. श्री लोकेश रामचंद्र सेजकर, सातमा, भुसावळ विभागातील दि. १४.२.२०२५ रोजी कर्तव्यावर देखभालीच्या कामात असताना, बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना एका मालगाडीच्या मध्यभागी तुटलेल्या अवस्थेत असलेले सील आढळले जे सामान्य तपासणीत सहसा दिसत नाही. त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यांच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

६. श्री अमरेन्द्र कुमार, भुसावळ विभागातील तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू) यांनी दि. ०९.०३.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना, रोलिंग-इन तपासणी दरम्यान, एका मालगाडीचा सीबीसी फ्रंट फॉलोअर आणि दुसऱ्या मालगाडीचा सीबीसी योक तुटलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले जे सहसा नियमित तपासणीत दिसून येत नाही. त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली आणि त्यांच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

७. श्री अनिल कुमार वर्मा, पॉइंट्समन, लासलगाव, भुसावळ विभागातील गेटमन यांना दि. १७.०३.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना,एका मालगाडीच्या पाचव्या आणि सहाव्या डब्यातून एक भाग लटकलेला दिसला. त्यांनी ताबडतोब स्टेशन मास्टर आणि रेल्वे व्यवस्थापकांना कळवले, त्यांच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टळली.

नागपूर विभाग

८. श्री संजीव कुमार, नागपूर विभागाचे ट्रेन व्यवस्थापक दि. १५.०३.२०२५ रोजी वर्धा स्थानकावर प्रस्थान करण्यापूर्वी स्थिर भार तपासणी दरम्यान त्यांना एका वॅगनचा सीटीआरबी (CTRB) कप तुटलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी सर्व संबंधितांना कळवले आणि वॅगन वेगळा करण्यात आला आणि ट्रेन सुरक्षितपणे पुढे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

९. श्रीमती मनीषा पारधे, तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू), आमला, नागपूर विभाग, दि. ०६.०२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना, जेव्हा त्या मालगाडीची नियमित तपासणी करत होत्या, तेव्हा त्यांना एका वॅगनचा सीबीसी तुटलेला आढळला. त्यांनी सर्व संबंधितांना कळवले आणि वॅगन वेगळा करून ट्रेन पुढे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

पुणे विभाग
१०. श्री मुकेश रवींद्र, कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूआय, मिरज, पुणे विभाग, दि. १२.०३.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना, ट्रॅक तपासणी दरम्यान, एका जाणाऱ्या लोकोचा सेंडर पाईप रुळांवरून ओढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब रेड हँड सिग्नल दाखवून ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकरण दुरुस्त झाले आणि संभाव्य दुर्घटना टळली.

सोलापूर विभाग
११. श्री समाधान प्रभू, ईएसएम, कुर्डुवाडी, सोलापूर विभाग, दि. ०७.०३.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना, डाउन लाईनवर ट्रॅक तपासणी दरम्यान, वेल्डला तडा गेल्याचे आढळले. त्यांनी सर्व संबंधितांना माहिती दिली आणि त्यांच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत केली.

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि कर्तव्यांप्रती असलेल्या त्यांच्या सतर्कतेचे आणि समर्पणाचे कौतुक करताना, महाव्यवस्थापक म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि जीवित, मालमत्तेचे आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल.

यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद, तसेच यावेळी मध्य रेल्वेचे इतर महत्त्वाचे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.