भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ-यावल दरम्यान असलेल्या अंजाळे घाटात अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत सुमारे आठ ते दहा ट्रक चालकांवर दगडफेक करीत त्यांना लुटल्याची घटना सोमवार ६ एप्रिल रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने वाहनधारकांमध्ये भीती पसरली असून याबाबत कोणतीही तक्रार नसल्याने यावल पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही असे यावल पोलिसांनी सांगीतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु आहे यामुळे वाहतूक बंद आहे परंतु अत्यावश्यक सेवांसाठी काही वाहनांमधून जीवनावश्यक वस्तू ट्रकद्वारे ने- आण करण्यात येत आहे . पोलिस यंत्रणे वर प्रचंड ताण आहे ही बाब जाणून याचा ग़ैरफ़ायदा काही दरोडेखोरांनी घेतला . अंजाळे घाटामधून येणार्या-जाणार्या वाहनांवर ७ ते ८ जणांच्या टोळीने वाहनांवर दगदफेक दगडफेक करीत वाहनांचा फोडल्या काचा फोडल्यां तसेच वळणावर
वाहने थांबवून त्यांना कु-हाड, काठयां लाठया आदीं शस्त्राचां धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला .
दरम्यान या दरोडया बाबत काही नागरीकांनी शंभर क्रमांकावरुन माहिती दिल्यानंतर भुसावळ शहर पोलिस ठाणे तसेच यावल पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी धाव घेतली.परिस्थिती माहिती जाणुन घेतली व सर्व बाजु तपासून बघता ही वाहने पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आली. दरम्यान भीतीपोटी यावल पोलिसात या संदर्भात अद्याप पर्यन्त एकही ट्रक चालक तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आला नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
तक्रार नसल्याने गुन्हा नाही – पोलिस निरीक्षक
अंजाळे घाटातील प्रकाराबाबत तक्रारदाराने तक्रार दिलेली नसून संबंधिताचा जवाब नोंदवण्यात आला आहे ,त्यानुसार अंजाळे घाटात यावल पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली.



