भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट तपासणीसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मार्च रोजी रात्री साडे 8 ते 9 वाजे दरम्यान घडली. सुमेध मेश्राम (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या तिकीट तपासणीसाचे नाव आहे सोमवार रोजी मालगाडीसमोर उडी घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे अकोला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

साडेआठ ते नऊच्या सुमारास मुर्तिजापूर स्थानकावर कर्तव्य बजावत असताना त्यांनी अचानक भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेतली. या घटनेची माहे वहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुमेध मेश्राम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुमेध मेश्राम यांनी सदर टोकाचे पाऊल का उचलले कारण समजले नाही .


