भुसावळात भरदिवसा चार तलवारीसह तिघे ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येथील जामनेर रोडवरील इंदिरानगर, भागातील कालिका माता मंदिराजवळ सापळा रचून चार तलवारीसह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवार 1 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता ताब्यात घेतले .यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली

शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जण तलवारी घेवून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकातील गोपाल गव्हाळे, सचिन पोळ, कमलाकर बागुल, गजानन देशमुख तसेच संघपाल तायडे यांना मिळाली यावरून पोलिसांनी तात्काळ जामनेर रोडवरील इंदिरानगर, कालिका माता मंदिराजवळ पोहचून सापळा रचला . यावेळी गोविंदा झाडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या बोळजवळ ही कारवाई करून संशयीत आरोपी सागर राजू यादव (वय 25), सागर अनिल संघवी (वय 20), भरत यादव खंडारे ( वय 18) सर्व राहणार इंदिरानगर, जामनेर रोड भुसावळ यांना त्वरित ताब्यात घेतले . त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीच्या चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपाल गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी तिघांना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.