कोरोना जनजागृतीसाठी प्रेरणादायी संवाद

भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या संपूर्ण जगभरात थैमान मांडलेल्या कोरोना विषाणूची आपल्याला लागण होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी कशी घ्यावी आणि लॉक डाऊनच्या काळात सकारात्मक जीवनशैली कशी जगावी यासंदर्भात भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा एक प्रेरणादायी संवाद म्हणून व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून सध्या हा व्हिडीओ सर्वदूर व्हायरल होत आहे.
विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे आगळावेगळा, नाविन्यपूर्ण व घरबसल्या करता येईल असा जनजागृतीपर प्रेरणादायी संवाद व्हिडिआेच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. यात कोरोना विषाणूसंदर्भात घ्यावयाची काळजी, लॉक डाऊनमुळे बदललेली जीवनशैली, झालेला सकारात्मक बदल, प्रत्येकाला मिळालेला धडा आणि त्यातून घ्यावयाची शिकवण याबाबत विविध तज्ज्ञांनी मते मांडली आहेत. विशेष म्हणजे महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनीसुद्धा लॉक डाऊनच्या काळात नेमके काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले आहे. प्रेरणादायी संवादातील व्हिडिओमध्ये प्रास्ताविकातून ज्ञानासह मनोरंजन गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी उपक्रमाबाबतची भूमिका मांडली आहे. तसेच समुपदेशक प्रा. निलेश गोरे (भुसावळ) प्रा. उमाकांत पाटील (फैजपूर) सौ. रागिणी चव्हाण (शिक्षण विस्तार अधिकारी, भुसावळ) प्रा. दिलीप ललवाणी (सेवानिवृत्त प्राध्यापक, भुसावळ), जीवन महाजन (प्राथमिक शिक्षक), डी. के. पाटील (पर्यवेक्षक, रावेर) दिलीप वैद्य (शिक्षक व पत्रकार), अमितकुमार पाटील (प्राथमिक शिक्षक, यावल), प्रा. समाधान पाटील (कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, दादरा व नगर हवेली), प्रदीप सोनवणे (प्राथमिक शिक्षक, भुसावळ), संजय ताडेकर (पर्यवेक्षक, यावल), प्रा.डॉ. प्रशांत फालक (समुपदेशक, जळगाव) आणि महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर) यांनी आपली सकारात्मक मते मांडली असून मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडीओ https://youtu.be/_TLSYgCjaww या लिंकवर उपलब्ध असून सध्या सर्वदूर व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *