गरजु व गरीबांच्या मदतीसाठी राजेश्री संघमित्रा महिला फाउंडेशन सरसावली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोना विषाणू (covid-19) च्या प्रादुर्भावामुळे शहरातील कष्टकरी, मोलकरी जे दिवसा कष्ट करून संध्याकाळी परिवाराची उदरनिर्वाह करतात अशा व्यक्तींवर विपरीत परिणाम होत आहे .संचारबंदीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरीब आणि गरजवंत कुटुंबाला जिवनावश्यक वस्तुंची मदत या कुटुंबांना देण्याकरिता येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशन मदतीकरीता पुढे सरसावली आहे . गरजवंत कुटुंबाला जिवनावश्यक वस्तुं यामध्ये ( गहू , तांदूळ,तुरदाळ, तेल, मीठ,साखर, चहा पावडर , हळद, मिरची पावडर ) आदींसामान गरजवंत नागरिक यांना वाटप करण्यात येणार आहे. या मदत कार्यात ज्यांना स्वेच्छेने व स्वखर्चाने बेघर, निराधार व्यक्तीं सढळ हाताने मदत करावयाची आहे ही मदत गहू, तांदूळ, दाळ, तेल किवा रोख रक्कम स्वरूपातही देऊ शकता.
ज्यांना मदत स्वरूपात जे काही द्यायचे असेल त्यांनी राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशन यांना संपर्क करावा,अथवा ज्यांना भेटुन मदत द्यायला जमनार नाही अशा दानशुर व्यक्तींनी आमच्या फाउंडेशनला संपर्क करून आर्थिक स्वरूपात आपली मदत करावी आपल्यां मदतीची गरजवंतांना आवश्यकता असल्याचे अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी कळवीले असून सहकार्यां बाबत आवाहन केले आहे . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *