गावठी बनविणार्‍यांना गाव सोडायची वेळ; तालुका पोलिसांची दिवसा आड कारवाई ;तळीरामांची गैर सोय; हातभट्टी अड्डे केले उध्वस्त

भुसावळ (प्रतिनिधी )-
संचारबंदी काळात सुद्धा चोरुन गावठी हातभट्टी दारू बनवीणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून आज शनिवार रोजी येथील तालुका पोलिसांनी सलग तीसऱ्यांदा शिवपूर कन्हाळा गावात पुन्हा तीन ठिकाणी धाड टाकून सुमारे एक लाख रूपयांची गावठी दारु व कच्चे रसायनासहअड्डे उध्वस्त केले आहे .या कार्रवाईमुळे गावठी हातभट्टी दारू बनविण्यचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या या गावातील गावठी बनविणार्‍यांना गाव सोडायची वेळ आली असल्याचे बोलले जात असून तळीरामांची मात्र चांगलीच गैर सोय होत असल्याचे दिसून य्यत आहे .
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा शेताच्या बाजूला 11 :30 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी सुभान तुकडू गवळी हा जळत्या भट्टीवर दारू तयार करत असताना त्याचे ताब्यात महू नवसागर ,गूळ मिश्रीत कच्चे रसायनचे 10 ड्रम सुमारे 1900 लिटर आणि गावठी हातभट्टीची 50 लिटर तयार दारू अंदाजे किंमत 47हजार 500 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला .
दूसऱ्या धडक कारवाईत
शिवपूर कन्हाळा येथे 12:40 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी इरफान हसन गवळी हा जळत्या चालू भट्टीवर दारू तयार करत असताना व त्याच्या ताब्यात महू ,नवसागर मिश्रीत कच्चे व गरम रसायन सह ६ ड्रम
सुमारे 1100 लिटर गावठी हात भट्टीची 40 लिटर तयार दारू अंदाजे किंमत 28हजार 600 रुपये किमतीचा माल मिळून आला .
तर तिसऱ्या कारवाईत
शिवपूर कन्हाळा या गावी शेताच्या बाजूला संशयीत आरोपी रशीद रन्नु गवळी हा जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना त्याच्या ताब्यात महू, नवसागर मिश्रीत गरम व कच्चे रसायन 6 ड्रम 1100 लिटर तयार दारू 65 लिटर अंदाजे किंमत 30 हजार 600 रुपयांचा असा माल मिळून आला.
या तिघां विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम 270 271 ,188 ,अन्वये गुन्हे दाखल केले असून या धाड़ीत एकूण 22 ड्रम मध्ये एकुण 1,06700/- रूपयांची गावठी हातभट्टी दारूचे कच्चे रसायन व दारु गाळण्याची सामग्री नष्ट करण्यात आ़ली आहे
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,पो. हे. कॉ. युनुस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे ,प्रवीण पाटील ,विजय पोहेकर ,रियाज काझी, अजय माळी , प्रेमचंद सपकाळे ,यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *