पळसखेडा येथे भारतीय बौद्ध महासभेचे दहा दिवशीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न ;

पळसखेडा:– बोदवड तालुक्यातील पळसखेडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दहा दिवशीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर सांगता समारोह सपन्न झाला.
सदर शिबिराचे मुख्य मार्गदर्शक जिल्हा सरचिटणीस व केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार हे होते.
शिबिराच्या समारोहास अध्यक्ष स्थानी प्रियंका अहिरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत संरक्षण विभागाच्या जिल्हा सचिव वनिता साळवे, जिल्हा संघटक ममता बोदडे, प्रकाश सरदार, बी. के. बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष मेजर रमेश साळवे, बोदवड तालुका अध्यक्ष शांताराम मोरे, तालुका सचिव प्रमोद सुरवाडे, उत्तम खराटे, चैत्रम सुरडकर, ग्राम पंचायत सदस्य राजू सुरवाडे हे होते.
या शिबिराचा गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन लाभ घेतला .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वैशाली सुरवाडे यांनी केले.