संघस्वयसेवक कर्मयोगी बापूराव मांडे यांचे वार्धक्याने निधन ; उद्या अंत्ययात्रा –

भुसावळ (प्रतिनिधी ) :
भुसावळ येथील हल्ली यावल तालुक्यातील हरिपूरा येथे वासतव्यास असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, माजी जिल्हा कार्यवाह तथा श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, पालक गोविज्ञान अनुसंधान केंद्र हरिपूरा मोहराळा चे अध्यक्ष श्री बापूराव मांडे तथा प्रभाकर मांडे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वार्धक्याने दि 16/3/2025 रविवार रोजी पहाटे 5.30 वा दुःखद निधन झाले आहे..
त्यांची अंत्यविधी सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता हरिपुरा येथे होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष , धर्म जागरण चे प्रांताचे कार्य करणारे सोनु भाऊ अर्थात महेंद्र प्रभाकर मांडे यांचे वडील आहेत त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुन नांतवडे व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था , मुक्ताई शिशू मंदीर जिजामाता प्राथमिक विद्यालय अहिल्यादेवी कन्या विद्यालय महाराणा प्रताप विद्यालय हिंदूसभा न्यास भुसावळ आश्रमशाळा हरिपुरा गोविज्ञान केंद्र हरिपूरा असा मोठा परिवार त्याच्या मागे आहे .
हरिपूरा हीच आपली कर्मभूमी समजून त्यांनी त्या ठिकाणी खडकाळ असलेला जमिनीवर नंदनवन फुलविले यासाठी त्यांनी आपले निवास हे हरिपूरा येथेच केला आहे . आजही 83 वय असतांना बापूराव प्रवास करत असत . व नेहमी इतरांनाही ते प्रेरणा देत असत .