मध्य रेल्वेतर्फे इन-हाऊस मास्क व सॅनिटायझरची निर्मिती ; भुसावळ विभागातर्फे – ६,२०० मास्क आणि ६२० लिटर सॅनिटायझर तयार

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, मास्क आणि सॅनिटायझर सारख्या अत्यावश्यक वस्तूंची मध्य रेल्वे इन-हाऊस निर्मिती करीत आहे, ज्याचा उपयोग आरोग्य सेवा कर्मचारी आणि आवश्यक कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांकडून करता येईल.
माटुंगा आणि परळ येथील कार्यशाळांमध्ये २,८३० मास्क आणि ३७५ लिटर सॅनिटायझर बनविण्यात आले आहेत.
मुंबई विभाग – ५,७५० मास्क आणि १४५ लिटर सॅनिटायझर;
नागपूर विभाग – ३,००० मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर;
सोलापूर विभाग – ३,००० मास्क आणि २४० लिटर सॅनिटायझर; पुणे विभाग – १,८०० मास्क आणि १६३ लिटर सॅनिटायझर;
भुसावळ विभाग – ६,२०० मास्क आणि ६२० लिटर सॅनिटायझर
वाणिज्यिक, आरपीएफ, ऑपरेटिंग आणि मेकॅनिकल विभागातील रेल्वे कर्मचार्‍यांनी उपरोक्त मास्क आणि सॅनिटायझर बनवले आहेत. वैयक्तिक योगदानाचाही यात समावेश असल्याचे नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे ३ एप्रिल रोजी
मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *