विज्ञान गणितावर प्रेम करा विषय सोपा होईल – सुनील वानखेडे


भुसावळ (प्रतिनिधी ) – विज्ञान व गणित या दोन विषयाचा लहानपणापासून दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो परंतु याचे ज्ञान आपल्याला होत नाही पाठ्यपुस्तकातील हे विषय शिकत असताना त्यातील संकल्पना क्लिष्ट वाटतात या विषयाला समजून घेतल्यास गणित व विज्ञान विषय अतिशय सोपा असल्याचे प्रतिपादन एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे चेअरमन सुनील वानखेडे यांनी केले
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया च्या वतीने विज्ञान गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय समिती सदस्य एस. आर.झांबरे हे होते. कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सुनील वानखेडे, राष्ट्रीय परीक्षक डॉ. पी. एस. कोळी पर्यवेक्षक एस.डी.बावस्कर
उपाध्याक्ष हेमंत चौधरी सायन्स प्रमुखपी.के.वंजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट विज्ञान शिक्षक प्रशांत वंजारी यांनी सांगितले
या कार्यशाळेत सुनील वानखेडे यांनी गणितातील विविध ट्रिक्स चा वापर करून कठीण वाटणारे गणित सोपे करता येऊ शकते यावरील प्रात्यक्षिक करून घेतले तर डॉ. पी. एस.कोळी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या या संकल्पनेवर आधारित विविध प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतली व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना सोप्या कशा होतात याबाबतचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री सरोदे यांनी तर आभार कविता पाटील यांनी मानले

इस्रोचे पोस्टर प्रदर्शन
भारत देशाने इतिहास रचत चंद्रयान तीन चे यशस्वी लँडिंग दक्षिण ध्रुवावर केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इस्रो या संस्थेविषयीची उत्सुकता वाढल्याने त्यांच्यासाठी इस्रोची सुरुवात तर आजचा इस्रो या विषयावरील पोस्टरचे एक्जीबिशन लावून माहिती देण्यात आली विज्ञान, अवकाश तसेच गणिताबद्दलची विविध नाविन्यपूर्ण माहिती दर्शविणारे माहिती या पोस्टर एक्जीबिशन मधून मिळाली.